Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

Mothepanala Swapne Havit-मोठेपणाला स्वप्ने हवी असतात द्वेष नव्हे.

  विषय :मोठेपणाला स्वप्ने हवी असतात द्वेष नव्हे. शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई आज भारत एका संक्रमण व्यवस्थेतून जात आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी भारतीय समाजालाच या भयानक व्यवस्थेतून बाहेर यावे लागेल. आजच्या भारतात विवेकी किंवा सुसंगत बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. कुठलीही गोष्ट कोणत्याही तत्वज्ञानाचा आधार न घेता किंवा कोणतेही पुरावे न देता चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे. भारतीय संविधानातील निधर्मीवाद, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोन या सर्व गोष्टींना तिलांजली दिली गेली आहे. समाजवाद, मुक्त्ततत्ववाद आणि विचार स्वातंत्र्य बाजूला सारून आजचा भारत धर्मांध आणि जातीयवादी होताना दिसत आहे. आज भारतीय समाजाचे घाणेरड्या पातळीवर जे ध्रुवीकरण होत असतानासुद्धा हा समाज काहीही न बोलता अविवेकीपणाने सर्व गोष्टींशी तडजोड करून समाधानी असल्याचे चित्र निर्माण होत आहे. हे फार भयानक आहे. अशा वेळेस प्रत्येक समाजात सर्व गोष्टींची चिकित्सक पद्धतीने मांडणी करणाऱ्या लोकांची गरज फार असते. आज भारतीय समाजात सांस्कृतिक ज्ञान संचीतेचे अध्ययन-अध्यापन करणारे कोणी दिसत नाही. जे कोणी स्वतः कडे अस...

Ahinsa aani Mahatma Gandhi

विषय : अहिंसा आणि महात्मा गांधी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम,मुंबई आजचा भारतीय समाज एका विचित्र संक्रमणातून जात आहे. सोशल मिडीयाचा व्यवस्थित वापर करून भारतीय समाजाचे सर्व क्षेत्रात ध्रुवीकरण होत असल्याचे दिसत आहे. चुकीच्या पोस्ट सोशल मिडीयावर दररोज येत असतात आणि त्यातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. सत्य न समजल्यामुळे आजच्या भारतीय समाजाची हालत महाभारतातील अश्वथामा सारखी झालेली दिसत आहे. महाभारतात अश्वथामा हा गरीब ब्राह्मण दांपत्यांचा म्हणजे आचार्य द्रोण आणि कृपी यांचा पुत्र. लहान असताना अश्वथाम्याला दुध हवे होते पण घरातल्या गरिबीमुळे त्याला दुध मिळत नव्हते. एकदा त्याने दुधाचा हट्ट धरला तेव्हा त्याला त्याच्या आईने पिठाचे दुध करून पाजले. तेव्हापासून त्याला तेच खरे दुध वाटू लागले. जेव्हा दुर्योधनाने त्याला खरे दुध दिले तेव्हा त्याला खऱ्या दुधाची चव न आवडल्यामुळे त्याने ते दुध थुकून टाकले. हीच गत आजच्या भारतीय समाजाची झाली आहे. धृविकरणाच्या विळख्यात तो पूर्णपणे अडकला गेला आहे. त्यातून बाहेर काढण्याचे सामर्थ आजतरी कोणत्याही नेतृत्वात दिसत नाही. हे सर्व लिह...