रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २७६ विषय क्रमांक : ४ विषय : रामराज्य: गरज शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता: माहीम, मुंबई संकेतस्थळ : एकविसाव्या शतकांची दोन दशके संपली तरी आपल्याला रामराज्य निर्माण होण्याची गरज वाटत असते. रामराज्य ही कल्पना फार जुनी असून ती वाल्मिकी रामायणातून प्रथम व्यक्त झाली आहे. पुढे ही कल्पना मध्ययुगीन काळामध्ये संत तुलसीदास पण मांडताना दिसतात. आधुनिक काळात सर्व मानवी समाजाला एक जागतिक दृष्टि मिळावी म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा ही कल्पना लोकप्रिय केली. मग इथे एक प्रश्न पडतो की रामराज्य म्हणजे काय? ते केव्हा स्थापन झाले? असे रामराज्य आजच्या वर्तमान काळात खरोखरच होऊ शकेल का? जे काही रामराज्य स्थापन झाले होते त्यात कोणत्याही उणीवा नव्हत्या का? जर उणीवा होत्या तर त्या उणिवांचे काय झाले? त्या कशाप्रकारे हाताळल्या गेल्या? जर रामराज्य आजच्या काळात स्थापन करायचे ठरविले तर त्या राज्याची मुल्ये काय असणार? जेव्हा आधुनिक काळात रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली तेव्हा त्यांना कोणत्या अनुषंगाने रामराज्य म्हणायचे होते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्याम...