रंग लेखणीचे परिवार आठवढा क्रमांक : २७२ विषय क्रमांक : ४ विषय: गरुडझेप शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई गरुडझेप हा शब्द आपण अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकत असतो. एखाद्याने असामान्य कर्तुत्व केले तर आपण म्हणत असतो त्या व्यक्तीने गरुडझेप घेतली आहे. मग प्रश्न पडतो की एखाद्या माणसाच्या सक्षम कामाची तुलना गरुड या पक्षाबरोबर का केली जाते ? याला कारण माणसाला आपले आयुष्य हे पायाने ठेचले जाणाऱ्या गोम , गांडूळ किंवा श्वानाप्रमाणे नको असते. त्याला नेहमी आपले आयुष्य उंच झेप घेणाऱ्या गरुडासारखे असावे असेच वाटत असते. त्यामुळे इथे एक गोष्ट सतत जाणवते की माणूस कोणत्याही धर्म संस्कृती मध्ये मोठा झाला , तरी गरुड या पक्षाला प्रत्येक मानवीजातीच्या हृदयात महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक संस्कृती मध्ये या पक्षाची प्रशंसा केली जाते. याचे कारण गरुडाची शक्ती आणि सामर्थ , धैर्य व अभिमान आणि आकाशात ढगापुडे झेप घेण्याची त्याची क्षमता त्याला वर्चस्वाचे प्रतिक बनविते. म्हणून प्रत्येक धर्म संस्कृतीमध्ये गरुडाला त्याच्या भव्य स्वरूपासाठी आदर व्यक्त केला आहे. यासाठीच त्याला पक्षांचा राजा म्हटले जाते. धारद...