रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २६० विषय क्रमांक : ४ विषय: वाचन संस्कृतीचे महत्व शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई संकेतस्थळ: हल्ली एक गोष्ट सातत्याने बोलली जाते ती म्हणजे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. असे विधान करणारे नेहमी याचे खापर तरुण पिढीवर टाकून मोकळे होतात पण ते स्वतः किती वाचन करतात याचा तपशील मात्र देत नाही. हे खरे आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तर वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि त्याचा फायदा सर्व पिढीतील लोकांना खासकरून भावी पिढीला जास्त होऊन ती पिढी सक्षम आणि सुजाण होण्यास मदत होईल. वाचन संस्कृतीमध्ये केंद्रस्थानी पुस्तक वाचणे असल्यामुळे तिथे असे एक वेगळे वातावरण तयार होते की त्याचा उपयोग माणसाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक यशासाठी होत जातो. कारण पुस्तक वाचणे ही बौद्धिक आणि सांस्कृतिक क्रिया असून ती मेंदूला निरोगी करून जिवंत ठेवते. त्यासाठी वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे. मग प्रश्न पडतो की वाचन संस्कृती म्हणजे काय ? वाचन संस्कृती म्हणजे ज्ञान, अनुभव, श्रद्धा, मुल्ये, वृत्ती, अर्थ, विश्वाच्या संकल्पना आणि लोकांच्या समूहान...