विषय: वाचन वेड शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे वेड असू शकते. वाचन वेड हे सुद्धा एक प्रकारचे व्यसन किंवा वेडच आहे. जर का हे वेड माणसाला एकदा लागले की ते कधीच सुटत नाही. आजच्या धावपळीच्या काळातसुद्धा माणूस हे वेड जपण्यासाठी तारेवरची कसरत करायला तयार होतो. अशी वाचन वेडी माणसे जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी विविध प्रकारची पुस्तके विकत घेऊन आपला वेळ वाचनात घालावीत असतात. ही माणसे दर महिन्याला सात ते आठ पुस्तके सहजपणे वाचून काढतात. अशा माणसांसाठी वाचन म्हणजे श्वास होऊ लागतो. वाचनाशिवाय त्यांना जगणे अशक्य होऊ लागते. मग अशी वाचन वेडी माणसे स्वतःच्या घरात असलेला एखाद्या कौंटुंबिक कार्यक्रमला किंवा मित्रांबरोबर बाहेर कुठेही न जाता घरात बसून नुसते पुस्तक वाचण्यात धन्यता मानतात. बऱ्याच वेळेस अशी माणसे पुस्तके विकत घेऊनच वाचत असतात. जर एखाद्या जवळच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी विचारले की ते तुमचे एखादे पुस्तक वाचायला घेऊ शकतात का ? तेव्हा ते पुस्तक देताना वाचन वेड्या माणसांच्य मनात , काही अपवाद सोडून , अस्वस्थता निर्माण होत असते. याला ए...