रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २२१ विषय क्रमांक :३ विषय: प्रजासत्ताक दिन शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम, मुंबई संकेतस्थळ : २६ जानेवारी १९५० हा दिवस सर्व भारतीयांच्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताची राज्यघटना निर्माण झाली आणि भारत एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजी साम्राजांपासून स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी भारताकडे कोणतीही राज्यघटना नव्हती. अशी राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान मसुदा समिती नेमण्यात आली. जेणेकरून सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या धर्म,भाषा,पंथ,जात,लिंग पद्धतीने समान अधिकार मिळण्याची सोय निर्माण होईल. अखेर अशी राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारली पण त्याची अंमलबजावणी मात्र २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. तसे करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे ते म्हणजे २६ जानेवारी १९३० रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लाहोर येथे भरलेल्या भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला ...