रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९१ विषय क्रमांक : ४ विषय : परीक्षार्थी ते ज्ञानार्थी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : प्रत्येक मानव मग तो पुरुष असो किंवा स्त्री जन्मल्यानंतर शिक्षित होण्यासाठी विद्यार्थी दशेतून जाणारच असतो. माणूस जेव्हा विद्यार्थी बनतो तेव्हा त्याची ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया चालू होते. त्याने आत्मसात केलेले ज्ञान किती योग्य आहे किंवा त्याला ज्ञानाची किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची परीक्षा घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे माणसाचे वेगळ्याप्रकारचे व्यक्तिमत्व तयार होते आणि त्याने आत्मसात केलेले ज्ञान अधिक सक्षम होऊन त्याचा फायदा सर्व समाजाला होत असतो. म्हणूनच या आठवड्याचा विषय परीक्षार्थी ते ज्ञानार्थी फार महत्वाचा आहे असे मला वाटते. त्यासाठी परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी यांच्यातील मुख्य फरक जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसे बघायला गेलं तर विद्यार्थी आणि परीक्षा यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण विद्यार्थी शाळेत जाऊ लागतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देणे जरुरीचे होते. त्यामुळे त्याला प्राप्त झालेले ज्ञान परीक्षेमु...