Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

Sananche Badalate Swarup-सणांचे बदलते स्वरूप (लेख)

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ३६४ विषय क्रमांक : ४ विषय : सणांचे बदलते स्वरूप (लेख) शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई पूर्वपार चालत आलेल्या सणांनी भारतीय समाजाला संजीवनी देण्याचे काम केले आहे हे निर्विवाद सत्य आहे. या सणांमुळे मानवी समाजात जी आपुलकी निर्माण झाली त्यातूनच माणसांचे एकमेकांमध्ये जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते सबंध निर्माण झाले हे सुद्धा खरे आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे सण येतात आणि ते भारतीय लोक मस्तपणे साजरेही करतात. याचाच अर्थ असा होतो की सण म्हणजे फक्त धार्मिक विधी नाहीत , तर समाजाला एकत्र आणणारा , माणसांना आपल्या संस्कृतींशी जुळवून ठेवणारा महत्वाचा सेतू आहे.   या पारंपारिक सणामागे अध्यात्मिक विचार तर असतोच , तसाच सामाजिक संदेश सुद्धा   असतो. त्यात एखादी मानवी भावनासुद्धा दडलेली असते ती बऱ्याचवेळा मनोरंजनातून व्यक्तसुद्धा होत असते. म्हणूनच सण आपल्या परंपरेचे जिवंत रूप आहे. आज भारतात ज्या प्रकारे सण साजरे होत आहे , त्यामुळे आपल्याला सणांच्या स्वरुपात काही बदल जाणवत आहे.   पण हा बदल सकारात्मक म्हणजे प्रगतीचा आहे का ...