Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

World book Day -पुस्तक दिनाच्या निमित्ताने

पुस्तक दिनाच्या निमित्ताने शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई आज जागतिक पुस्तक दिन. आजचा दिवस हा लेखक आणि पुस्तकांना समर्पित केलेला दिवस. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लेखकांच्या प्रति आदर व्यक्त करून लहान मोठे सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. पुस्तक वाचनाचा उत्सव साजरा करण्यासाठी  23  एप्रिल हा दिवस घेण्याचे कारण म्हणजे ह्या दिवशी लेखक  Miguel De Cervantes  यांची पुण्यतिथी त्याचप्रमाणे विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन.   पुस्तक वाचन म्हणजे अनेकविध अनुभव घेणे. पुस्तकांशी मैत्री केलीत तर आपण एका ठराविक गोष्टीपुरते मर्यादित न राहता आपण आपल्या    कक्षा रुंदावत नेतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत होते आणि अनेक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. पुस्तकेच आपले चांगले मित्र आहेत कारण ज्ञानाच्या अनेक शाखा आपल्यासाठी ते उपलब्ध करतात. पुस्तक वाचन माझ्यासाठी खुप महत्वाचा आणि निकटचा विषय आहे. वाचनाने ज्ञानप्राप्ती तर होतेच पण मनोरंजनसुद्धा होते. त्यातून बौद्धिक आणि मानसिक विकाससुद्धा होतो. आजच्या सोशल मीडियावर दिल्य...