संविधान बनत असताना महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पंधरापैकी अकरा महिला यांना महिला दिनाच्या दिवशी त्रिवार सलाम जागतिक महिला दिन २०२५ आपणास माहित आहे की क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँड मध्ये जागतिक महिला दिन सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता. सुरुवातीला कोणतीही तारीख महिला दिन साजरी करण्यासाठी निश्चित केली नव्हती पण १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळेला रशियात महिलांनी 'ब्रेड आणि पीस' आंदोलन करून सम्राट निकोलासला राज्यकारभार सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी रशियात वापरल्या जाणाऱ्या ज्युलिअन कॅलेंडरप्रमाणे तारीख होती २३ फेब्रुवारी आणि ग्रेगरियन कॅलेंडरनुसार तारीख 8 मार्च होती. म्हणून दरवर्षी महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. पुढे १९७५ पासून संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीम...