विषय : भारतीय प्रजासत्ताकाची ७५ वर्षे शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई आज २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक ७५ वर्षे पूर्ण झाली. भारतीय लोकांच्या संविधानिक गरजा लक्षात घेऊन संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही राज्यघटना बनविली गेली. या राज्यघटनांच्या म्हणजे संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत न्याय , स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व यांवर भर देऊन भारताची एकता आणि अखंडता निश्चित केली गेली. हे संविधान संसदीय लोकशाही स्वीकारते आणि विधिमंडळ , कार्यपालिका , न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे अशा चार लोकशाही स्तंभाचे स्वातंत्र्य प्रस्थापित करते. त्याचप्रमाणे न्यायमूर्तीनी न्याय देताना कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करू नये म्हणून राज्यघटना न्यायमूर्तीना घटनात्मक शपथ घेण्यास लावते. म्हणूनच भारतीय संविधान भारतीय लोकांसाठी फार महत्वाचा दस्तऐवज आहे आणि हा दस्तऐवज २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारला गेला त्याला आज २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. ही लिखित राज्यघटना अशा देशासाठी लिहिली गेली जो देश प्रत्येक बाबतीत विविधता असलेला देश आहे. वेगळी ...