विषय: पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव: हिरोज ऑफ हिस्टरी ( Heroes of History) लेखक: Will Durant ( विल ड्युरंट ) प्रकाशक: Simon and Schuster ( सायमन आणि शुस्टर) पाने: ३३० किमत: रुपये ६९९/- शब्दांकन : योगेश गोगवेकर विल ड्युरंट यांची लेखन शैली विद्वान माणसांपेक्षा सामान्य माणसासाठी अधिक जवळची असल्या कारणाने मला त्यांची पुस्तके नेहमीच वाचायला आवडतात. इतिहास आणि तत्त्वज्ञानातील घटना व कल्पना विल ड्युरंट यांनी इतक्या सोप्या आणि रोमांचक पद्धतीने मांडल्या आहेत म्हणून सामान्य माणसांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आशावादी होत जातो. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे अकरा खंडातील द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकात उत्कृष्ट कृतींचा दस्तऐवज मानला जातो. या पुस्तकात प्राचीन काळापासून ते आधुनिक जगाच्या सुरुवातीपर्यंत मानवी जीवन आणि संस्कृतीचा इतिहास मांडताना त्यांनी सर्व बाजूने घडलेल्या घटनांचा विचार आत्मसात केल्याचे जाणवते. विल ड्युरंट यांचे ‘ हिरोज ऑफ हिस्टरी ’ (Heroes of History ) हे पुस्तक ...