विषय: पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव: द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन ’ लेखक: ग्रेनविल ऑस्टिन ( Granville Austin) प्रकाशक: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस पाने: ४२१ किमत: रुपये ४२० शब्दांकन : योगेश गोगवेकर २६ जानेवारी १९५० साली भारत प्रजासत्ताक देश झाला. या दिवशी भारताने स्वतः तयार केलेली राज्यघटना अंमलात आणली. भारतीय लोकांच्या संवैधानिक गरजा लक्षात घेऊनच ही राज्यघटना सक्षमपणे बनविली गेली. हे संविधान बनविताना विधीमंडळाच्या अनेक सदस्यांचे योगदान तर होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान फार मोठे होते. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. या संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत न्याय , स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व यांवर भर देऊन भारताची एकता आणि अखंडता निश्चित केली गेली. हे संविधान संसदीय लोकशाही स्वीकारते आणि विधिमंडळ , कार्यपालिका , न्यायपा लिका आणि प्रसारमाध्यमे अशा चार लोकशाही स्तंभाचे स्वातंत्र्य प्रस्थापित करते. त्याचप्रमाणे न्यायमूर्तीनी न्याय देताना कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करू नये म्हणून राज्यघटना न्यायमूर्तीना घटनात्मक ...