विषय: पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव: On the meaning of life (जीवनाचा अर्थ) लेखक: Will Durant (विल डुरंट) प्रकाशक: Promethean Press (प्रोमिथिअन प्रेस) पाने: ११० किमत: रुपये १३६३/- शब्दांकन : योगेश गोगवेकर जेव्हा काही वाईट बातम्या कानावर येतात तेव्हा मन खूपच अस्वस्थ होते आणि काहीही करावासे वाटतं नाही. मग अशा अस्वस्थ मनाला फुंकर घालण्यासाठी स्वतःला आवडलेल्या काही गोष्टी परत एकदा करावयाच्या वाटतात. त्या गोष्टी म्हणजे एखादे चांगले पुस्तक परत एकदा वाचणे किंवा आपले आवडते संगीत ऐकणे अथवा आवडता चित्रपट परत पाहणे. ते करत असतानाच आपल्याला समजते की कोणीतरी नवीन काव्य करतो , कुणी सुंदर गाणं गातो , कुणी छान लिहीत असतो आणि मग मनात निर्माण झालेला अस्वस्थपणा दूर होतो आणि जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टी तयार होते. इथे मला The Sound Of Music या सुंदर इंग्रजी संगीतमय चित्रपटातील एका गाण्याची आठवण येते. ते गाणे होते , “The hills are alive sound of Music, With songs they have sung for a thousand years.... हे गाणे मला खूप आवडते कारण हे गाणे प्रत्येकाला कठीण परिस्थितीत जगण्याची ऊर्जा निर्माण करते. हे गाणे...