रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २३० विषय क्रमांक : ३ विषय :अस्तित्व शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम, मुंबई संकेतस्थळ : अस्तित्व म्हणजे असण्याचा भाव किंवा असण्याची स्थिती. अस्तित्व म्हणजे एखाद्या अस्तित्वाच्या वास्तविकतेशी संवाद साधण्याची क्षमता. अस्तित्वाची अचूक व्याख्या करणे एक कठीण काम आहे. म्हणून अस्तित्वाची व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात समजून घ्यावी लागेल. तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास अस्तित्व म्हणजे वस्तूंचे प्रकार आणि त्यांची संरचना कशी आहे हे सांगण्यासाठी केलेला वैज्ञानिक प्रयत्न. जर अस्तित्व तत्वज्ञानाच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भौतिकवादाचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. येथे भौतिकवाद असे म्हणतो की अस्तिवात असलेल्या सर्व गोष्टी म्हणजे पदार्थ आणि उर्जा, या सर्व भौतिकापासून बनलेल्या आहेत. सर्व क्रियांना ऊर्जा आवश्यक आहे आणि सर्व घटना पदार्थाच्या परस्परसंवादाचा परिणाम आहे. द्वंद्वात्मक भौतिकवाद अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वस्तूंमध्ये फरक तर करत नाही पण त्या विविध वस्तूंचे वस्तुनिष्ठ वास्तव नक्कीच परिभाषित करतो. जेव्हा आपण अस्तित्व आदर्शवादानु...