Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

New Year Resolutions न्यू इयरचे रेझोल्युशन्स

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २१७ विषय कार्मांक : ४ विषय : न्यू इयरचे रेझोल्युशन्स शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई न्यू इयरचे रेझोल्युशन्स ही पश्चिमात्य जगातील परंपरा आहे. मागील काही दशकांपासून ती पूर्वेकडील देशातसुद्धा आढळत आहे. भारत देशसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. त्यात प्रत्येक मानवी व्यक्ती आपले मागील वर्षाचे अवगुण सोडून नवीन वर्षी चांगले वर्तन करण्याचा संकल्प करते. सुरुवातीला लोक धार्मिक पद्धतीने अशा प्रकारचे संकल्प करीत असे. इथे लोक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या देवतांना असे वचन देत असत की त्यांनी उधार घेतलेल्या वस्तू परत देतील किंवा एखादे कर्ज घेतले असेल तर ते व्याजासकट परत करू. ही परंपरा बहुतेक रोमन लोकांनी चालू केली असावी असे काही पुरावे इतिहासात आढळतात. दरवर्षी हे लोक जानुस (ज्यावरून जानेवारी हे नाव पडले) या देवाला नवीन वर्षी चांगल्या गोष्टी करू असे वचन देऊन नवीन वर्षाची सुरुवात करीत असत. पुढे मध्ययुगामध्ये अनेक शूर योद्धे आपली शूरता दाखविण्याचे वचन देवतेला देत असत. त्यासाठी अनेक ख्रिस्ती बांधव वॉचनाईट सेवांमध्ये जाऊन तसा संकल्प करीत असत. प्रत्येक नवीन ...