रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८७ विषय क्रमांक : ४ विषय : उन्हाळ्यातील प्रवास वर्णन शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई भारतीय परंपरेनुसार वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत , शिशिर असे सहा ऋतू आहेत. या सहा ऋतूत भारतातील तीन ऋतू म्हणजे उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा व्यवस्थितपणे सामावलेले आहेत. प्रत्येक ऋ्तूंचे वेगवेगळे सोहळे असतात. जर सृष्टीचे महत्व आणि तिची विविधता समजून घेण्यासाठी आपण सर्व ऋतुमध्ये प्रवास करणे गरजेचे आहेत. भारतात प्रामुख्याने हिवाळ्यात बरेचजण प्रवास करणे पसंद करतात. त्यानंतर पावसाळ्यात प्रवास करतात पण उन्हाळ्यात प्रवास करणे म्हणजे बऱ्याच भारतीयांना त्रासदायक वाटत असते. उन्हाळा म्हणजे त्यांच्यासाठी एक शापच असल्यासारखे ते समजतात. ज्या उन्हाळ्यात प्रवास करण्यासाठी बहुतेक भारतीय लोक नाखुष असतात तोच उन्हाळा मला नेहमीच निसर्गाने वरदान दिल्यासारखा वाटतो. शाळेमध्ये असताना मला उन्हाळा हा ऋतू तर फारच आवडत असे कारण या दिवसात शाळेकडून मिळणारी उन्हाळ्याची मोठी सुट्टी तर असायचीच. या सर्वांपेक्षा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणज...